आरती सद्गुरूरायाची ॥ धृ ॥ आरती सद्गुरूरायाची । करिता सद्भावे साची ॥ धृ ॥ तनमन अर्पूनी या गुरूला । प्रेमे ओवाळू त्याला । पंचप्राणांच्या वाती । लावूनी नेत्रांच्या पाती । मन हे स्थिर करुनि पहा । रेवा तिरी सद्गुरू हा ॥ दुसरा देव नसे ऐसा । भक्तजनांच्या पुरवुनी आशा । सोडूनि जाती संस्कृती पाशा । धरू हो कास आम्ही त्याची । असे ही कामधेनु आमुची ॥ १ ॥ ध्यान हे रम्य किती दिसते । धरी हो हाती दंडा ते । भाळी भस्माच्या रेषा । शोभती तीन पहा कैशा । कटी पदी पर तो झळकतसे । कौपिन रम्य किती भासे । कमंडलू तो वंशाचा । हाती शोभतसे साचा ॥ विधीहरिहर हे त्रयमूर्ती । दत्तची ऐसे, मजला भासे, मन्मनिच वसे । मूर्ती मनहरणी साची । असे ही कामधेनू आमुची ॥ २ ॥ दयाळू कितीतरी मी सांगू । वाणी होत असे पंगू । केवळ ज्ञानाचा भानू । तियेचे गुण किती वर्णू । स्वामी वासुदेवराया । सतत मी शरण तुझे पाया । वासुदेव करी आरती । दिधली सद्गुरूंने स्फूर्ती ॥ स्वामी सद्गुरूरायाची । करिता आरती, दूर्दिन जाती, सुदिन भासती, पहा प्रचीती । सत्ता सर्व ही सद्गुरूंची ।
आरती सद्गुरूरायाची
श्री दत्तात्रेय · आरत्या
परिचय एवं महत्व
आरती सद्गुरूरायाची (श्री दत्तात्रेय) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। आरत्या के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।
पाठ की विधि
प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री दत्तात्रेय के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ आरती सद्गुरूरायाची का पाठ करें।
पाठ के लाभ
भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।