← श्री कृष्ण संग्रह पर वापस जाएं

भूपाळी घनश्याम श्रीधराची

श्री कृष्ण · भूपाळी

परिचय एवं महत्व

भूपाळी घनश्याम श्रीधराची (श्री कृष्ण) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। भूपाळी के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

भूपाळी घनश्याम श्रीधराची घनश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला । उठि लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला ॥धृ०॥ सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षी । अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी । अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरण-दक्षी । प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ॥ करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनि कुक्षी । यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी ॥ मुक्तता होऊ पाहे कमळिणीपासुनिया भ्रमरा । पूर्वादिशे मुख धुतलें होतसे नाश तिमिरा ॥ उठिं लवकरि गोविंदा सावळ्या नंदकुमरा । मुखप्रक्षालन करी अंगिकारी भाकरकाला ॥१॥ घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती । गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति-जाती । प्रवर्तोनी गृहकामीं रंगावलि घालुं पाहती । आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती ॥ काढि धार क्षीरपात्र घेऊनी धेनू हंबरती । दारिं उभे गोपाळ तुजला हाक मारुनि बाहती । हे सुमनहार कंठी घालि या गुंजमाळा । हाती वेत्रयष्टि बरवी कांबळा घेइ तू काळा । ममात्मजा मधुसूदना हृषिकेशी जगत्पाळा । लक्षितां हरी धेनुस्तनपानाला ॥२॥ प्रातःस्नाने करूनि गोपिका अलंकारे नटती । कुंकुमादि चर्चुनी मंथनालागी आरंभिती । प्रेमभरित अंतरात वदनी नामावलि गाती । अर्घ्यदान देऊनियां द्विजजन देवार्चन करिती । नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णुपूजा समर्पिती । स्मार्त शिवार्चनसक्त, शक्तिं, शाक्तही आराधिती । ऋषिगण आश्रमवासी जे कां निरंजनी धाले । अरुणोदय होताचि आपुले ध्यानी मग्न झाले । पंचपंच उषःकाली रविचक्र निघों आले । एवढा वेळ निजलासि म्हणुनि हरि कळेल नंदाला ॥३॥ विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी । अध्यापन गुरु करिती शिष्यही अध्ययना उदयीं । याज्ञिकजन यज्ञकुंडि आहुती टाकिताति पाहीं । रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही । हे माझे सांवळे पाडसे उठि कृष्णाबाई । सिद्ध सवें बलिराम घेऊनी गोधने बना जाई । मुनिजनमानसहंसा श्रीमन:कमलभृंगा । मुरहर पंकजपाणी पद्मनाभ श्रीरंगा । शकटांतक सर्वेशा हे हरिप्रतापतुंगा । कोटिरवींहुनि तेज आगळे तुझिया वदनाला । होनाजी बाळ नित्य ध्यातसे हृदयी नाममाळा ॥४॥

सभी श्री कृष्ण पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री कृष्ण के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ भूपाळी घनश्याम श्रीधराची का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।