← नित्यकर्म संग्रह पर वापस जाएं

भूपाळी संतांची

नित्यकर्म · भूपाळ्या

परिचय एवं महत्व

भूपाळी संतांची (नित्यकर्म) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। भूपाळ्या के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

भूपाळी संतांची उठिं उठिं बा पुरुषोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा । मेघश्यामा श्रीकृष्णा ॥धृ०॥ भक्तमंडली महाद्वारीं । उभी तिष्ठत श्रीहरी ॥ जोडोनियां दोन्ही करी । तुज मुरारी पहावया ॥१॥ संत सनकादिक नारद । व्यास वाल्मिकी ध्रुव प्रल्हाद ॥ पार्थ पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बलिराजा ॥२॥ झाला प्रातःकाळ पूर्ण । करीं पंचांगश्रवण ॥ आला मुद्गलभट ब्राह्मण । आशीर्वचन घे त्याचें ॥३॥ तुझा नामदेव शिंपी । घेऊनि आला आंगीटोपी ॥ आतां जाऊं नको बा झोंपी । दर्शन देई निजभक्तां ॥४॥ नानापरिचे अलंकार । घेऊनि आला नरहरि सोनार ॥ आला रोहिदास चांभार । जोडा घेऊनि तुजलागीं ॥५॥ सुगंध सुमनें पुष्पांजली । घेऊनी आला सांवता माळी ॥ म्हणे श्रीहरिपदकमळीं । अनन्यभावें समर्पू ॥६॥ कान्हुपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करी । घेऊनि उभा राहिला ॥७॥ लिंबुर हुरडा घेऊनि आला । तो हा माणकोजी बोधला ॥ दर्शन द्यावे बा त्याजला । भक्त भोळा म्हणऊनी ॥८॥ मीराबाई तुझेसाठीं । दूध-तुपें भरूनी वाटी ॥ तुझे लावावया ओंठीं । लक्ष लावुनी बैसली ॥९॥ नामदेवाची जनी दासी । घेऊनी आली तेल-तुपासी ॥ तुज न्हाऊ घालावयासी । उभी ठेली महाद्वारीं ॥१०॥ गुळ-खोबरें भरुनी गोणी । घेऊनि आला तुकया वाणी ॥ वव्हा राखिल्या कोरड्या पाणी । भिजों दिल्या नाहीं त्वां ॥११॥ आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ॥ त्याचा करोनियां उद्धार । संतमेळी स्थापिला ॥१२॥ हरिभजनाविण वायां गेले । ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले । खेळावया तुजलागीं ॥१३॥ गरुडपारीं हरिरंगणी । टाळमृदंगांचा ध्वनी ॥ महाद्वारीं हरिकीर्तनीं । तल्लिन कान्हा हरिदास ॥१४॥ निजानंदें रंगे पूर्ण । सर्वहि कर्मे कृष्णार्पण ॥ श्रीरंगनुजतनुज शरण । चरणसेवा करीतसे ॥१५॥

← पिछला पाठ सभी नित्यकर्म पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर नित्यकर्म के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ भूपाळी संतांची का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।