← श्री दत्तात्रेय संग्रह पर वापस जाएं

श्रीगुरुचरित्र (बावन्नश्लोकी)

श्री दत्तात्रेय · प्रमुख स्तोत्रे व कवच

परिचय एवं महत्व

श्रीगुरुचरित्र (बावन्नश्लोकी) (श्री दत्तात्रेय) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। प्रमुख स्तोत्रे व कवच के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

अथ बावन्नश्लोकी गुरुचरित्र श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेय गुरुवे नमः । अथ ध्यानम् दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूल डमरु गदा च । पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रय ध्यानमभीष्टसिद्धिदम् ॥ १ ॥ काषायवस्त्रं करदंडधारिण कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥ कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ ३ ॥ ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमारा । जय जयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ त्रिमूर्ति राजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करूनि ओजा । सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥ जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णवतुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडे केलें ॥ ३ ॥ ऐसी शिष्याची विनंती । ऐकोनी सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ती । प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥ भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्राकारणे भगीरथें । गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥ तीर्थे असती अपार परी । समस्ता सांडुनि प्रीतीकरी । कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥ ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीती । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति यतिराया ॥ ७ ॥ गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षे गुप्ती । तेथूनि श्रीगुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥ श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारूनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरूपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥ सिद्ध म्हणे एक वत्सा । अवतार झाला श्रीपादहर्षा । पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥ श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरवसा जीविताचा ॥ १२ ॥ श्रीगुरुचरित्रकथामृत । सेविता वांच्छा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधू ॥ १३ ॥ ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनू जाण । सांगता झाला विस्तारें ॥ १४ ॥ ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । माझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥ विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । श्रीगुरूचरित्र विस्तारें ॥ १६ ॥ ऐक शिष्या नामकरणी । श्रीगुरुभक्तशिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन झाली निर्धारें ॥ १७ ॥ ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनी । आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥ अज्ञानतिमिरजनींत । निजलों होतो मदोन्मत्त । श्रीगुरुचरित्रवचनामृत । प्राशन केलें दातारा ॥ १९ ॥ स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरूपें अमरपुरासी । औदुंबरी असती जाण ॥ २० ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशीं ज्ञानविवेका । तये प्रेतजननीसी ॥ २१ ॥ तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थी मन ऐकतां । झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥ लोटांगणे श्रीगुरूसी । जाऊनि राजा भक्तीसी । नमस्कारी विनयेंसी । एकभावेकरूनियां ॥ २३ ॥ शिष्यवचन परिसुनी । सांगतां झाला सिद्धमुनी । एक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥ सिद्ध म्हणे एक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसें ॥ २५ ॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमूं रे युक्तीसी । वेदांत न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥ चतुर्वेद विस्तारेसीं । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥ २७ ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मनासी । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥ पुढें कथा कवणेंपरी । झाली असे श्रीगुरुचरित्रीं । निरूपावें विस्तारीं । सिद्धमुनीं कृपासिंधू ॥ २९ ॥ श्रीगुरूचरित्रसुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृप्त नव्हे गा मानसीं । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झाले एका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥ पतिव्रतेची रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणेंपरी निरूपिली ॥ ३२ ॥ श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारूनी आम्हांसी । निरूपावें स्वामिया ॥ ३३ ॥ श्रीगुरु म्हणती दंपतीसी । एका पाराशरऋषी । तया काश्मीरराजासी । रुद्राक्षमहिमा निरूपिला ॥ ३४ ॥ पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारूनि सांगा वहिली । मति असे माझी वेधली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥ गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारू । सांगतां नये विस्तारू । तावन्मात्र सांगतसें ॥ ३६ ॥ ऐसा श्रीगुरू दातारू । भक्तजनां कल्पतरू । सांगता झाला आचारू । कृपा करूनि विप्रांसी ॥ ३७ ॥ झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा । माझे मन निवविं वेगीं ॥ ३८ ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झाले एका । साठ वर्षे वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥ सिद्ध म्हणें नामधारका । अपूर्व वर्तले आणिक एका । वृक्ष झाला काष्ठसुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥ जयजयाची सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवातुनी । नानाधर्म विस्तारुनी । श्रीगुरुचरित्र निरूपिलें ॥ ४१ ॥ मागें कथानक निरूपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरूंनीं त्यासी निरूपिलें । कलत्र पुत्र आणी म्हणती ॥ ४२ ॥ श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत-व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वी बहुतीं आराधिलें ॥ ४३ ॥ श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभुवन । आपण नये आतां येथूनि । सोडूनि चरण श्रीगुरूचे ॥ ४४ ॥ तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥ गाणगापुरी असतां श्रीगुरू । ख्याती झाली अपारू । लोक येती थोरथोरू । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥ सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें गुरुचरित्र । तत्परतेसी परियेसा ॥ ४७ ॥ श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसीं । शेती आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥ त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीती गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥ ४९ ॥ तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥ राज्यनेटी घेऊनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥ ५१ ॥ म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकलाभीष्ट लाधेल ॥ ५२ ॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत्श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥

सभी श्री दत्तात्रेय पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री दत्तात्रेय के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ श्रीगुरुचरित्र (बावन्नश्लोकी) का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।