← श्री दत्तात्रेय संग्रह पर वापस जाएं

श्रीगुरुपादुकाष्टक

श्री दत्तात्रेय · प्रमुख स्तोत्रे व कवच

परिचय एवं महत्व

श्रीगुरुपादुकाष्टक (श्री दत्तात्रेय) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। प्रमुख स्तोत्रे व कवच के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

श्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेच विराग जाला । मनोद्रीचा जडभाग गेला । साक्षात् परमात्मा मज भेटवीला । विसरूं कसा मी गुरुपादुकांला ॥१॥ सद्योगपंथे घरि आणियेले । अंगेच माते परब्रह्म केले । प्रचंड तो बोधरवी उदेला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥२॥ चराचरी व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची । परंपदी संगम पूर्ण जाला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥३॥ जो सर्वदा गुप्त जनांत वागे । प्रसन्न भक्तां निजबोध सांगे । सद्भक्तिभावाकरिता भुकेला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥४॥ अनंत माझे अपराधकोटी । नाणी मनी घालुनि सर्व पोटी । प्रबोध करिता श्रम फार जाला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥५॥ काही मला सेवनही न जाले । तथापि तेथे मज उद्धरीले । आता तरी अर्पीन प्राण त्याला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥६॥ माझा अहंभाव वसे शरीरी । तथापि तो सद्गुरु अंगिकारी । नाही मनी अल्पविकार ज्याला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥७॥ आता कसा हा उपकार फेडू । हा देह ओवाळूनि दूर सांडू । म्या एकभावे प्रणिपात केला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥८॥ जया वानिता वानिता वेदवाणी । म्हणे 'नेति नेति' ती लाजे दुरूनी । नव्हे अंत ना पार ज्याच्या रूपाला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ॥९॥ जो साधुचा अंकित जीव झाला । त्याचा असे भार निरंजनाला । नारायणाचा भ्रम दूर केला । विसरू कसा मी गुरुपादुकाला ॥१०॥

← पिछला पाठ सभी श्री दत्तात्रेय पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री दत्तात्रेय के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ श्रीगुरुपादुकाष्टक का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।