← समर्थ रामदास संग्रह पर वापस जाएं

करुणाष्टके

समर्थ रामदास · करुणाष्टके

परिचय एवं महत्व

करुणाष्टके (समर्थ रामदास) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। करुणाष्टके के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

करुणाष्टके अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परम दिनदयाळा नीरसीं मोहमाया । अचपळ मन माझें नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥१॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनधनाचा वेर्थ म्यां स्वार्थ केला । रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तुझी धरावी ॥२॥ विषयजनित सूखें सौख्य होणार नाही । तुजविण रघुनाथा ओखटें सर्व काही । रविकुळटिळका रे हीत माझे करावे । दुरित दुरि हरावें स्वरूपी भरावें ॥३॥ तनु मन धन सकळ स्वजन तोडितां तोडवेना । घडिघडि बिघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणउनि करुणा हे बोलतो दीन वाचा ॥४॥ जळत लोटी तळमळ निवावी रे राम करुण्यसिंधू । षड्रिपुकुळ माझें तोडिं रे दीनबंधू ॥५॥ हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी । तळमळ निवावी रे राम कारुण्यसिंधू । षड्रिपुकुळ माझें तोडिं रे दीनबंधू ॥५॥ तुजविण करुणा हे कोण आणेल माजी । सिणत सेणत पोटी पाहिली वाट तुझी । झडकरी झड घाली धाव पंचानना रे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥७॥ सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी । दिवस गणित बोटी प्राण ठेवूनि कंठी । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥८॥ जननिजनकमाया लेंकरं काय जाणे । पाय न लगत मूखी हाणिता वत्स नेणे । जलधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पथिया भूमिवासी ॥९॥ तुजविण मज तैसे जाहलें देवराया । विलग विषमकाळीं तूटली सर्व माया । सकळजनसखा तूं स्वामि आणिक नाहीं । विषयवमन जैसें त्यागिले सर्व काही ॥१०॥ स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे । जिवलग जीव घेती प्रेत सांडूनि जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥ सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे । जिवलग मग कैचे चालते हेचि साचें । विलग-विषमकाळी सांडिती सर्वभाळी । रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी ॥१२॥ सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनि आले । भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त जाले । भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना । परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥१३॥ उपरति मज रामीं जाहली पूर्णकामी । सकळजनविरामी रामविश्रामधामी । घडि घडि मन आतां रामरूपी भरावें । रविकुळटिळक रे आपुलेसे करावें ॥१४॥ जलचर जलवासी नेणती त्या जलासी । निशिदिन तुजपासी चूकलो गुणगासी । भूमिधर निगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी तुजविण रामा मज कंठवेना ॥१५॥ भेटी दे रामदासी ॥१५॥ असंख्यात ते भक्त होऊनि गेले । तिही साधनांचे बहू कष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१६॥ बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरिकंदरी भेटी नाहीं जनांसी । स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१७॥ सदा प्रेमराशी तया भेटलासी । तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी । अहंता मनी शब्दज्ञाने बुडालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१८॥ तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले । बहू धारणा थोर चकित जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥१९॥ बहूसाल देवालयें हाटकाची । रसाळा कळा लाघवें नाटकाची । पूजा देखितां जाड जीवी गळलों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥२०॥ कितेकी देहे त्यागिले तुजलागी । पुढे जाहले संगतीचे विभागी । देहेदुःख होताचि वेगी पळालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥२१॥ किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती । पस्तावलो, कावलो तप्त जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥२२॥ सदा सर्वदा राम सोडूनि कामी । समर्था तुझे दास आम्ही निकामी । बहु स्वार्थबुद्धीने रे कष्टवीलो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥२३॥ नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही । नसे प्रेम हें रामविश्राम नाही । असा दीन अज्ञान मी दास तुझा । समर्था जनी घेतला भार माझा ॥२४॥ उदासीन हे वृत्ति जीवी धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी । सदा प्रीति लागो तुझे गुण गाता । रघुनायका मागणे हेंचि आतां ॥२५॥ सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेंचि आतां ॥२६॥ नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा । सगुणी मज लावि रे भक्तिपंथा । रघुनायका मागणे हेंचि आता ॥२७॥ भवें व्यापलो प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्व चिंता हरावी । मला संकटी सोडवावे समर्था । रघूनायका मागणे हेचि आतां ॥२८॥ मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । नको संशयी तोंडी संसारव्यथा । रघूनायका मागणें हेंचि आता ॥२९॥ समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना । तुटो संशयो नीरसी सर्व चिंता । रघूनायका मागणें हेंचि आता ॥३०॥ द्विदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तासि रे उद्धरावे । सुटे ब्रीद आम्हांसि सोडूनि जातां । रघूनायका मागणे हेचि आतां ॥३१॥ तुझिया वियोगें जीवित्व आलें । शरीरपांगे बहु दुःख जाले । अज्ञानादारिद्र माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥३२॥ विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमाने पडिलों प्रवाही । स्वहित माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥३३॥ संसारसंगे बहु पीडलों रे । कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षें सांभाळि दीना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥३४॥ तुजवीण रामा मज माझें राघवा रूप तुझे । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे । प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळ भजनलीळा लागली आस तुझी ॥३५॥ संसारचिंता चुकवी समर्था । दासा मनी आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥३५॥

← पिछला पाठ सभी समर्थ रामदास पाठ

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर समर्थ रामदास के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ करुणाष्टके का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।