← श्री शिव संग्रह पर वापस जाएं

नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या

श्री शिव · स्तोत्र

परिचय एवं महत्व

नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या (श्री शिव) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। स्तोत्र के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॐ नमो जी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥१॥ ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचालका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥२॥ जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा मनोजदमना । शुद्ध चैतन्या मनमोहना । कर्ममोहका विश्वंभरा ॥३॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयी ॥४॥ संकेतें अथवा हास्यें करून । भलत्या मिषें घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहा लागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥५॥ न कळत प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ । औषध नेणतां भक्षित । परि रोग हरे तत्काळ ॥६॥ जय जय शिव मंगलधामा । निजजनतारक आत्मारामा । चराचर फलंकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥७॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदा भालालोचना । भवभंजना महेश्वरा ॥८॥ हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशानाईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरिशा ॥९॥ धराधरेंद्र मानससरोवरी । तू शुद्ध मराल क्रीडसी निर्धारी । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥१०॥ न कळे तुझे अदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ताकारण । कोठें प्रगटसी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥११॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्व काळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥१२॥ सदाशिव हीं अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परम पावन संसारी । होऊनी तारी इतरांते ॥१३॥ बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चित्तांचा करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित्तां आगळे ॥१४॥ नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यांसी सर्व सिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥१५॥ जय जयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकृंतना । मदमत्सरकानदहना । निरंजना भवहारका ॥१६॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥१७॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवाहना अंधकमर्दना । दक्षप्रजापति मखभंजना । दानवदमना दयानिधे ॥१८॥ जय जय किशोर चंद्रशेखरा । उर्वीवरेंद्र नंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥१९॥ कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयीमूर्ते ॥२०॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परम मंगला परब्रह्मा ॥२१॥ जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तूं वेदवंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरूपें भद्रायुप्रती । अगाध नीती कथिलीस ॥२२॥ जय जय भस्मोद्धूलितांगा । योगध्येया भक्तभवभंगा । सकळजन आराध्यलिंगा । नेई वेगीं तुजपाशीं ॥२३॥ जेथें नाही शिवाचे नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृहपर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥२४॥ जेथे शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार । ज्यासी शिव शिव छंद निरंतर । त्याहीं जिंकिले कलिकाळा ॥२५॥ जयाची शिवनामीं भक्ती । तयाची पापें सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरूप ॥२६॥ जैसें प्राणियाचें चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं लागत । तरी मग बंधन कैंचें ॥२७॥ कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदविध्वंसप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥२८॥ मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥२९॥ आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमाळांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥३०॥ धन्य धन्य तेचि जन । शिवभजनीं जे परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥३१॥ सूत सांगे शौनकाप्रती । जे भस्मरुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासि नाही गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥३२॥ जे करिती रुद्राक्ष धारण । त्यांसी वंदिती शक्रदुहिण । केवळ तयांचे घेता दर्शन । तरती जन तत्काळ ॥३३॥ ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण । स्त्री बालवृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥३४॥ शिवकीर्तन नावडे अणुमात्र । तें अंत्यजाहूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥३५॥ जरी भक्षती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगीचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥३६॥ शिव शिव म्हणतां वाचे । मूळ न राहे पापांचें । ऐसें माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥३७॥ जो जगदात्मा सदाशिव । ज्यासि वंदिताति कमलोद्भव । गजास्यइंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥३८॥ जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाहृदयाब्जमिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वंभर दयाब्धी ॥३९॥ जो पंचमुख दशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुर मर्दन । भेदातीत भूतपती ॥४०॥ तो तू स्वजन भद्रकारका । संकटी रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ती अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥४१॥ म्हणोनि भावें तुजलागून । शरण निघालो असें मी दीन । तरी या संकटांतून । काढुनी पूर्ण संरक्षी ॥४२॥ नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त

सभी श्री शिव पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री शिव के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।