← श्री शिव संग्रह पर वापस जाएं

श्रीशिवस्तुती

श्री शिव · स्तोत्र

परिचय एवं महत्व

श्रीशिवस्तुती (श्री शिव) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। स्तोत्र के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

श्रीशिवस्तुती कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झलाळी ॥ कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ॥ ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥ जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ॥ पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥ वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ॥ उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥ उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ॥ दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥ ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ॥ गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥ कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हलाहलें कंठ निळाचि साजे ॥ दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥ स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ॥ उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥ भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ॥ राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥ नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ॥ सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥ भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ॥ तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥ इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ ॥ उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥ भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ॥ विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥ प्रयाग वेणी सकळा हराच्या । पदारविंदीं वाहाती हरीच्या ॥ मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥ कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ॥ एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥ सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगावळी महंता ॥ अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥ सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शत कोटिभानू ॥ गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥ कर्पूरगौर स्मरल्याविसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ॥ अंतीं स्वरहीत सूचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥ विरामकाळीं विदळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ॥ चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥ सुखावसानें सकळें सुखाची । दुःखावसानें टळती जगाची ॥ देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥ अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ॥ कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥ शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ॥ भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥ पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ॥ श्रीवेददत्त दुरितकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥ जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंचीं तुटली उपाधी ॥ शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥ निधानकुंभ भरला अभंग पाही निजांगें शिव ज्योतिर्लिंग ॥ गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥ मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वाहा शंकरासी ॥ काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥ जाजु चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ॥ प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥ अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ॥ नेंई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥ नागेशनामा सकळा जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ॥ पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥ एकांतिं ये रे गुरुराजस्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ॥ शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥ शास्त्राभ्यास नको श्रुती पदुं नको तीर्थासि जाऊं नको । योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको । काळाचें भय मानसीं धरूं नको दुष्टांसि शंकूं नको । ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

← पिछला पाठ सभी श्री शिव पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर श्री शिव के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ श्रीशिवस्तुती का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।